आ.लंके यांच्या आवाहनाला नगर तालुक्यातही प्रतिसाद, खडकी ग्रामपंचायत बिनविरोधच्या दिशेने

 आ.लंके यांच्या आवाहनाला नगर तालुक्यातही प्रतिसाद,  खडकी  ग्रामपंचायत बिनविरोधच्या दिशेने



नगर : पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा व २५ लाख विकास निधी घ्या असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. पारनेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध करण्यावर एकमत होत असतानाच नगर तालुक्यातील जनतेनेही ग्रामपंचायत बिनविरोध करण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे.

बुधवारी सकाळी आमदार लंके यांनी नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक असणाऱ्या गावातील लोकांची बैठक राष्ट्रवादी भवन अहमदनगर येथे आयोजित केली होती.या बैठकीला प्रवीण कोठुळे, शरद कोठूळे, पत्रकार जितेंद्र निकम, सरपंच अशोक कोठुळे, उपसरपंच भाऊसाहेब रोकडे, रावसाहेब कोठुळे, पंढरीनाथ कोठुळे, तंटा मुक्ती चे अध्यक्ष सुनील कोठुळे, राहुल बहिरट, आदिनाथ गायकवाड, अरुण कोठुळे, मनेश भोसले, चेअरमन ज्ञानदेव भोसले, राजू कोठुळे, माजी चेअरमन गोवर्धन कोठुळे,स्वप्नील कोठुळे, राजेंद्र पंढरीनाथ कोठुळे, विजय काळे यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते.यावेळी आमदार लंके यांनी निवडणूकांमुळे गावात होणारे वाद,तंटे, भावकितील संघर्ष यांचा गावाच्या एकोप्यावर आणि विकासावर कसा परिणाम होते हे सर्व गावकऱ्यांना सविस्तर सांगितले. .त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खडकी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय खडकी ग्रामस्थांनी घेतला. खडकी ग्रामपंचायत  ५० वर्षानंतर बिनविरोध होत  आहे.



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post