नितीशकुमार यांना जोर का झटका, जेडीयूचे ६ आमदार भाजपात

 

 नितीशकुमार यांना जोर का झटका, जेडीयूचे ६ आमदार भाजपातइटानगर: बिहार विधानसभा निवडणुकीत जास्त जागा जिंकूनही नितीशकुमार यांना मुख्यमंत्री पद देऊन उदारता दाखवणाऱ्या भाजपने नितीशकुमार यांनी यांच्या जदयूला चांगलाच झटका दिला आहे. भाजपने अरूणाचल प्रदेशात नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे ६ आमदार स्वत:च्या गोटात खेचून घेतले आहेत. अरूणाचल प्रदेशात ‘जदयू’चे सात आमदार होते. मात्र, त्यापैकी सहा आमदारांना भाजपने गळाला लावल्याने अरूणाचल विधानसभेत आता ‘जदयू’चा केवळ एक आमदार शिल्लक राहिला आहे. याशिवाय, पीपल्स पार्टी ऑफ अरूणाचल पक्षाच्या करदो निग्योर यांनीही भाजपचे कमळ हातात धरले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post