पहिल्या टप्प्यात 'इतक्या' जागांसाठी पोलिस भरती: गृहमंत्री अनिल देशमुख

 

पहिल्या टप्प्यात 5 हजार 298 जागांसाठी पोलिस भरती: गृहमंत्री अनिल देशमुखनागपूर : कोरोना महामारीमुळे राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही. तरीही राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या अटी व शर्तींचे पालन करून राज्यात साडेपाच हजारापेक्षा जास्त जागांवर पोलीस शिपाई भरती करण्याचे नियोजन केले. त्या भरती प्रक्रियेत स्थानिक युवक व युवतींचा सहभाग वाढावा. त्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य पोलीस दलात निवड होण्यासाठी मैदानी आणि लेखी परीक्षेची उत्तम तयारी करा. जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा आणि पोलीस दलात निवड होण्यासाठी हीच सुवर्णसंधी आहे. त्या संधीचे सोने करण्याचे आवाहनही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

नागपूर येथे काटोल व कोंढाळी येथे  त्यांच्या हस्ते पोलीस भरती पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यातील पोलीस दलात साडेबारा हजार पदांची भरती करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात 5 हजार 298 जागा भरल्या जाणार असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्र पोलीस दलाने कोरोनाकाळात उत्तम काम केल्याचे सांगून या काळात 296 पोलीस शहीद झाल्याचे त्यांनी सांगितले. आता साडेबारा हजार पोलीसांची भरती करण्यात येणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post