अवघ्या 5 वर्षाच्या पर्व लोढा याची विक्रमी कामगिरी

 अवघ्या 5 वर्षाच्या पर्व लोढा याची अभिमानास्पद कामगिरी

हुला हुप प्रकारात एक मिनिटात सर्वाधिक रिंग रोटेशनचा विक्रम


नगर : करोनामुळे लागलेला सक्तीचा लॉकडाऊन अनेकांसाठी नवीन चांगले शिकण्याची संधी ठरला. नगरमधील अवघ्या पाच वर्षे वयाच्या पर्व जितेंद्र लोढा याने याच काळात हुला हुप रिंग रोटेशन हा क्रीडा प्रकार शिकून त्यात नैपुण्य मिळवले. त्याने एक नोव्हेंबर 2020 रोजी एक मिनिटात 176 हुला हुप रिंग रोटेशन तर 2 नोव्हेंबर रोजी एक मिनिटात 147 रिंग रोटेशन करून विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याच्या या कामगिरीची चिल्ड्रन्स रेकॉर्डस तसेच नॅशनल प्राईड बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद झाली आहे. त्याला या दोन्ही संस्थांकडून प्रमाणपत्र आणि आकर्षक ट्रॉफीने गौरविण्यात आले आहे.
अवघ्या पाच वर्षाच्या चिमुरड्याने केलेली ही कामगिरी नगरकरांसाठी मोठा गौरव ठरली आहे. पर्व लोढा हा किंडर किडसमध्ये युकेजीमध्ये शिकत आहे. लॉकडाऊन काळात सक्तीने घरीच रहावे लागले होते. या काळात त्याने स्मिता विरेंद्र लोढा यांच्याकडे हुला हुप रिंग रोटेशनचे धडे घेतले. सुरुवातीला गंमत म्हणून हुला हुपचा सराव करताना पर्व अतिशय कमी काळात त्यात पारंगत झाला. यातूनच त्याने एका मिनिटात सर्वाधिक रोटेशन करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. या खेळासाठी त्याला आई स्नेहा जितेंद्र लोढा व वडील जितेंद्र लोढा यांचे मोठे प्रोत्साहन मिळाले. अतिशय कमी वयात अभिमानास्पद कामगिरी करणार्‍या पर्व याचे नगरकरांकडून अभिनंदन होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post