भरधाव टेम्पोची उसाच्या बैलगाड्यांना धडक, चार उस तोडणी मजुर, तीन बैल जखमी

 


भरधाव टेम्पोची उसाच्या बैलगाड्यांना धडक, चार उस तोडणी मजुर, तीन बैल जखमी
नगर : नगर दौंड रोडवरील ढोकराई फाट्याजवळ मंगळवारी पहाटे झालेल्या अपघातात 4 ऊस तोडणी मजुरांसह तीन बैल गंभीर जखमी झाले. भरधाव वेगाने जाणार्‍या टेम्पोने उसाच्या दोन बैलगाड्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. रामदास गोरख महाजन, मनिषा रामदास महाजन, बाबासाहेब नागरगोजे, सुनिता नागरगोजे ( बीड) व त्यांचे तीन बैल जखमी झाले आहेत. जखमींवर दौंड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. बैलगाड्यांची मोडतोड झाली आहे.  नागवडे साखर कारखान्याकडील बैलगाडी ऊस भरण्यासाठी काष्टीकडे पहाटे जात होत्या. याप्रकरणी टेम्पो चालक भास्कर जगन्नाथ ठाकरे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post