पोलिसांच्या छाप्यात ८८ हजारांचा गुटखा जप्त

 


पोलिसांच्या छाप्यात ८८ हजारांचा गुटखा जप्त



कर्जत (प्रतिनिधी):-माहीजळगाव येथे कर्जत पोलिसांनी 88 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. 

            दिनांक 23 डिसेंबर 2020  रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कर्जत पोलिसांनी माहीजळगाव येथील गुरुकृपा पान सेंटर मध्ये छापा टाकून सदर  टपरीमधून महाराष्ट्र शासनाची बंदी असलेला 88 हजार 51 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला असून गुटखा विक्रेता लक्ष्मण झुंबर भिसे ( वय 36 वर्ष,राहणार माहिजळगाव) यास रंगेहात ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 1160/2020 भा. द. वि. क. 188, 272, 273 सह अन्नसुरक्षा मानके 26 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव व पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून तपास पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस अंमलदार भाऊसाहेब यमगर, गोवर्धन कदम, अमित बरडे, सुनील खैरे यांनी ही कारवाई केली  असून सदर गुन्ह्यात पोलीस अंमलदार सुनील खैरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हाचा तपास पोलीस अंमलदार प्रल्हाद लोखंडे हे करत आहेत

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post