खळबळजनक...खासगी लॅबकडून रूग्णाचा खोटा करोना पॉझिटिव्ह रिपोर्ट,

 खळबळजनक...खासगी लॅबकडून रूग्णाचा खोटा करोना पॉझिटिव्ह रिपोर्ट, एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलनगर : करोना काळातील सर्वात धक्कादायक अफरातफर आणि फसवणुकीचा प्रकार नगरमध्ये उघडकीस आला असून विळद घाटातील विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमधील कृष्णा डायग्नोस्टिक प्रा.लि.या लॅबमधील अधिकारी, कर्मचार्‍यांनी बोगस करोना पॉझिटिव्ह रिपोर्ट तयार केल्याच समोर आले आहे. याबाबत अशोक बबनराव खोकराळे (वय 47, रा.पाईपलाईन रोड, सावेडी) यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अशोक खोकराळे यांचे मयत वडील बबन नारायण खोकराळे (वय 79) यांचे दोन बनावट व खोटे करोना पॉझिटिव्ह रिपोर्ट तयार करून देत लॅब चालकांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांची फसवणूक केल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. दि.13 ऑगस्ट 2020 व दि.14 ऑगस्ट 2020 रोजी मयत बबन नारायण खोकराळे यांनी स्वत: लॅबमध्ये येवून स्वॅब दिल्याचे व त्यांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट लॅबने दिले आहेत. वास्तविक त्या दिवशी मयत बबन खोकराळे हे हॉस्पिटलच्या आय.सी.यु.मध्ये होते, असे फिर्यादीने नमूद केले आहे. यामध्ये शहरातील एका बड्या हॉस्पिटलचेही नाव समोर आले आहे. एमआयडीसी पोलिसांनी सदर फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपास चालू आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post