'ईडी'च्या कार्यालयावर प्रदेश भाजप कार्यालय असल्याचा बॅनर

ईडीच्या कार्यालयावर प्रदेश भाजप कार्यालय असल्याचा बॅनरमुंबई  : राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या  नेते आणि आमदारांना एकापाठोपाठ ईडीच्या नोटीस मिळाल्यामुळे अखेर शिवसेना आता आपल्या जुन्या अवतारात रस्त्यावर उतरली आहे. शिवसैनिकांनी थेट ईडीच्या कार्यालयावर भाजपचे बॅनर लावून एकच दणका उडवून दिला आहे.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयाला ईडीने नोटीस बजावली. त्यांची चौकशी सुरू आहे. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही नोटीस पाठवण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली. एकीकडे संजय राऊत यांनी नोटीसीवरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे शिवसैनिकांनी मुंबईतील ईडीच्या कार्यालयाचे नावच बदलून टाकले आहे. ईडीच्या कार्यालयावर हे 'भाजप प्रदेश कार्यालय'असं सांगत बॅनरच लावले आहे. शिवसैनिकाच्या या कृत्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post