श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलीच्या जयघोषाने दुमदुमला पिंपळाचा वाडा

 *श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलीच्या जयघोषाने दुमदुमला पिंपळाचा वाडा*श्रीरामपूर ३०/१२:गौरव डेंगळे:


अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या अधिपत्याखाली श्री स्वामी समर्थ केंद्र पिंपळाचा वाडा खंडाळा येथे दिनांक २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर पर्यंत अखंड नामजप, यज्ञयाग सप्ताह उत्साहात संपन्न झाला.

आज नित्य स्वाहाकार,सत्यदत्त पूजन, महानैवेद्य आरती व  महाप्रसादाने अखंड नामजप, यज्ञ-याग सप्ताहाचा सांगता समारंभ अतिशय चैतन्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी जिल्हाभरातून नव्हे तर राज्यभरातून हजारो भाविक या सांगता समारंभासाठी उपस्थित होते.

या सप्ताहाच्या काळामध्ये सामूहिक श्री गुरुचरित्र पारायण, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप, श्री स्वामी समर्थ ग्रंथांचे अखंड पारायण, गायत्री मंत्र,महामृत्युंजय मंत्र,गणेश याग, मनबोध याग,गीताई याग,श्री स्वामी याग,चंडी याग,रुद्र याग, मल्हारी याग इत्यादी सेवा श्री स्वामी समर्थ गुरुमाउलींचा चरणी रुजू करण्यात आली.

सप्ताहाच्या काळामध्ये सेवेत श्रद्धेने मनोभावे होऊन अध्यात्मिक दिव्य आनंदाचा व गुरुकृपेचा लाभ घेतला. माता बहिणींनी या सप्ताहाच्या काळामध्ये अधिक सेवेचा लाभ घेतला. यावेळी परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने याग्निक  विभागाचे श्री बाळकृष्ण पांगरकर यांनी सातही दिवस अतिशय नियोजनबद्ध सेवा स्वामीं चरणी रुजू केले. सांगता समारंभासाठी खंडाळा चे ज्येष्ठ नागरिक श्री अण्णासाहेब सदाफळ, सरपंच श्री अशोकराव पवार, माजी उपसरपंच श्री दिनकरराव सदाफळ,ग्रामसेवक सौ शीतल पांधरे,उपसरपंच सौ मंजूताई ढोकचौळे,श्री सुखदेव सोडणार, ज्येष्ठ पत्रकार श्री अशोक अभंग,श्री महेश ढोकचौळे,श्री अजितकुमार डेंगळे,श्री मदन चौधरी,श्री शिवाजी पाचोरे,श्री ताराचंद अलगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post