'सिरम'चे सायरस पुनावाला यांना 'हा' पुरस्कार द्यावा, मनसेची मागणी

 सिरमचे सायरस पुनावाला यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा

मनसे नेते बाळा नांदगावकर यांची मागणीमुंबई:  सीरम इन्स्टिट्युटच्या माध्यमातून  संस्थेचे संस्थापक सायरस पुनावाला यांनी अनेक रोगांवर लस उपलब्ध करून दिल्या आहेत. आता ही संस्था कोविडवरील लसीचं संशोधन करत आहे. सायरस पुनावाला यांचं हे योगदान लक्षात घेऊन त्यांना राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी एक ट्विट करून ही मागणी केली आहे. सायरस पुनावाला हे सीरम इन्स्टिट्युटच्या माध्यमातून गेली अनेक दशके विविध रोगांवर लस उपलब्ध करून देत आहेत. या महामारीत सुद्धा पूर्ण जगाला त्यांनी लसीचे मोठया प्रमाणात उत्पादन करून मोठा दिलासा दिला आहे. पुनावाला यांचे कार्य हे महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावणारे असेच आहे. त्यामुळे सायरस पुनावाला यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे ही विनंती, असं ट्विट नांदगावकर यांनी केलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post