जेव्हा पक्षकाराच्या न्यायासाठी न्यायाधीश स्वत: कोर्टाबाहेर येतात....

 पक्षकाराच्या न्यायासाठी न्यायाधीश आले कोर्टाबाहेर....

अहमदनगर महालोक अदालतमधील घटना



     नगर - मनातील इच्छाशक्ती कृतीत उतरली कीकर्तव्याचे समाधान मिळतेया उक्तीप्रमाणे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये पक्षकारामधील वाद संपुष्टात आणण्यासाठी आणि सामोपचाराने तडतोड व्हावीयाकरिता एक सकारात्मक पाऊल उचलून अहमदनगर येथील वरिष्ठ स्तर न्यायाधीश श्रीमती सोनल एस.पाटील यांनी एका वृद्ध असहाय्य महिला पक्षकाराकडे स्वतजाऊन न्याय दिला.

     या विषयी सविस्तर हकीकत अशी कीअहमदनगर जिल्हा न्यायालयात  वकिल संघ  विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होतेयेथील चौथे सह दिवाणी न्यायाधीश यांचे न्यायालयात एक दिवाणी दावा प्रलंबित होतादरम्यान कुटूंबातीलच वाद असल्याने आपआपसात तडजोड होऊन वाद प्रलंबित होतादरम्यान कुटूंबातीलच वाद असल्याने आपआपसात तडजोड होऊन वाद विषय संपुष्टात आणावाअशी दोन्ही पक्षकारांची तयारी झालीत्यानुसार वादी  प्रतिवादी यांनी परस्पर संमतीने वकिलामार्फत लोक न्यायालयात सदरचे वाद प्रकरण तडजोडीसाठी ठेवलेहे प्रकरण जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमधील तिसर्या मजल्यावरील पॅनल समोर नेमण्यात आलेतडजोडीचा अर्ज सादर केल्यानंतर अर्जातील कथनाबाबत दोन्ही पक्षकाराची सत्यापन पडताळणी होण्यासाठी आणि खात्री करुन घेण्यासाठी पक्षकाराची उपस्थिती आवश्यक होतीपरंतु सदर दाव्यातील प्रतिवादी असलेली महिला वृद्ध  जिना चढण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्याने तिला चार चाकी गाडीत बसवून आणलेले आहेअसे वकिलांनी पॅनल समोर सांगितलेपॅनल प्रमुख न्यायमुर्ती सोनल एस.पाटील यांनी हा पेच सोडवण्यासाठी तात्काळ पार्किंगमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि पॅनल सदस्य ॅड.अरुणा उनवणे-राशिनकरॅड.दीपा झांबरेउपस्थित असलेले ॅड.सुनिल मुंदडा यांच्यासह प्रत्यक्ष पार्किंगमध्ये जाऊन कायद्याप्रमाणे खात्री केली आणि पक्षकाराच्या इच्छेनुसार वाद विषयामध्ये तडजोड करुन दावा निकाली काढला.

     अशाप्रकारे लोक न्यायालयाचा मूळ उद्देश सफल व्हावा आणि न्यायप्रविष्ट प्रकरणामधील कटूता कमी होऊन तडजोडीच्या माध्यमाने न्याय संस्थेवरील अतिरिक्त ताण कमी होण्यासाठी न्यायिक अधिकार्यांनी उचित पाऊल उचलून पक्षकाराच्या न्यायासाठी सोयीस्कर भुमिका घेत सामाजिक बांधिलकी जपली अशी चर्चा वकिल वर्गात झालीयापूर्वीही एका लोक न्यायालयात फायनान्स कंपनी आणि कर्जदार यांचा वाद मिटवण्यासाठी कर्जदारास पैसे जमवूनही काही रक्कम कमी पडलीत्यावेळी न्यायाधीश सोनल पाटील यांनी पॅनल प्रमुख असतांना सामाजिक भावनेतून पुढाकार घेऊन तो वाद मिटवला होता.

     यावेळी ॅड.डी.एस.घोलपॅड..एस.कोल्हेपार्किंगमध्ये उपस्थित असलेले इतर वकिलन्यायालयीन कर्मचारीपोलिस आदि उपस्थित होेतेया घटनेचे विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा न्यायाधिश रेवती देशपांडे यांनी कौतुक केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post