ग्रामपंचायत निवडणुक... जात पडताळणी प्रमाणपत्र अर्ज स्विकृतीसाठी कार्यालय सुटीच्या दिवशीही चालू राहणार

ग्रामपंचायत निवडणुक... जात पडताळणी प्रमाणपत्र अर्ज स्विकृतीसाठी कार्यालय सुटीच्या दिवशीही चालू राहणार नगर : मा.राज्य निवडणुक आयोग यांनी राज्यातील १४२३४ ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर केला असुन त्यामध्ये अहमदनगर जिल्हयातील ७६७ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.राखीव जागेवर निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी कमी कालावधी राहिला असल्याने दिनांक २५, २६ व २७ डिसेंबर २०२० या शासकिय सुट्टयांचे दिवशी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज स्वीकारण्यासाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय सुरु ठेवण्यात येणार आहे. या सुट्टयांचे दिवशी सकाळी ११.०० ते ०५.०० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. तरी या सुट्टयांचे दिवशी अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज सादर करावेत, असे आवाहन श्रीमती. अ.मु.शेख, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अहमदनगर यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post