रेखा जरे खून प्रकरणाला महिना उलटला...नगर शहरात कॅंडल मार्च..

 रेखा जरे खून प्रकरणाला महिना उलटला...नगर शहरात कॅंडल मार्च.. मुख्य आरोपीच्या अटकेची मागणीनगर : नगरमधील यशस्विनी महीला ब्रिगेडच्या अध्यक्षा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या  हत्येला ३० डिसेंबर रोजी एक महिना पूर्ण झाला., मात्र, अद्यापही या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठेला अटक झालेली नाही. आरोपी बाळ बोठे फरार असल्याने या निषेधार्थ बुधवारी रात्री  शहरात कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठेला लवकरात लवकर अटक करण्याची मागणीही करण्यात आली. नगरमधील विविध स्वयंसेवी संघटनांनी हा कँडल मार्च काढला होता.आमदार संग्राम जगताप यांनीही मोर्चाला पाठिंबा देत पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी केली.

रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीला महिना उलटूनही अटक न झाल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्याचपार्श्वभूमीवर बाळ बोठेच्या अटकेची मागणी करत जरे कुटुंबीय आणि स्वयंसेवी संघटनांच्या वतीने कापड बाजार ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. यामध्ये सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.

यावेळी सर्वांनी जरे यांच्या हत्येचा निषेध करून सूत्रधार असलेला आरोपी पत्रकार बाळ बोठे याला लवकरात लवकर पोलिसांनी अटक करावी अशी मागणी केली. तसेच अटक न झाल्यास प्रसंगी आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post