बिग बी अमिताभ बच्चन यांनी केली चोरी! महिलेचा आरोप

बिग बी अमिताभ बच्चन यांनी केली चोरी! महिलेचा आरोप बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही तितकेच सक्रीय असतात. अनेकदा ते त्यांचे विचार,मत ट्विटर किंवा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर करत असतात. यात अनेकदा ते काही कवितादेखील पोस्ट करतात. मात्र, यावेळी एक कविता शेअर केल्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत. एका महिलेने त्यांच्यावर कविता चोरल्याचा आरोप केला आहे.

काही दिवसांपूर्वी बिग बींनी ट्विटरवर चहावर आधारित एक कविता शेअर केली होती. मात्र, या कवितेवरुन वाद सुरु झाला आहे. टीशा अग्रवाल या महिलेने या कवितेवर हक्क दाखवला आहे. ही कविता आपली असून बिग बींनी शेअर करताना त्याचं क्रेडिट किंवा श्रेयदेखील दिलं नाही, असं म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post