वाळु वाहतुकीची गाडी विना कारवाई सोडण्यासाठी लाच, दोन पोलिस कर्मचारी'एसीबी'च्या जाळ्यात

वाळु वाहतुकीची गाडी विना कारवाई सोडण्यासाठी लाच, दोन पोलिस कर्मचारी'एसीबी'च्या जाळ्यात नगर : कोपरगाव तालुक्यातील तक्रारदाराच्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक विनाकारवाई सहीसलामत शहरातून पास होण्यासाठी एक हजारांची लाच स्वीकारताना दोन पोलिस कर्मचारी 'एसीबी'च्या जाळ्यात अडकले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगरमधील पथकाने नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे ही कारवाई केली.

संतोष बाळु पागी,  (वय ३५, पोलीस नाईक  ब न. १९७६.वर्ग ३रा- हल्ली मु- श्री आंधळे यांचे घरात भाड्याने, माधवनगर, लासलगाव रोड मनमाड.मुळ रा- बापन विहीर, ता- त्र्यंबकेश्वर जि नाशिक.) व दिलीप बाजीराव निकम,( वय ५१, पोलीस हवालदार ब नं २४३२, वर्ग ३रा- मु पो साकुरा, ता. नांदगाव जि नाशिक) दोघे नेमणूक  - मनमाड शहर पोलीस ठाणे. ता- मनमाड,  जि नाशिक , अशी आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार यांच्या वाळुच्या तीन ट्रक अधिकृतपणे गुजरात ते शिर्डी अशी वाळु वाहतूक करतात. सदरच्या ट्रक मनमाड शहर पोलीस ठाणे हद्दीतुन पास होताना त्यांची अडवणूक करुन काही कायदेशीर कारवाई न करणे करिता वर नमूद दोन्ही आरोपी लोकसेवक यांनी तक्ररदार यांचे कडे पंचासमक्ष १ हजार रुपयांची मागणी करुन ती लाचेची रक्कम आज रोजी मनमाड शहरातील मनमाड चौफुली येथे आयोजित सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष  स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले .सापळा अधिकारी शाम पवरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

▶ **मार्गदर्शक* -*1)मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

2)मा.श्री निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

3) मा. दिनकर पिंगळे, वाचक पोलीस उपअधीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

४. हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला प्र वि अहमदनगर


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post