एटीएम कार्ड चोरून 60 हजार लांबविले

एटीएम कार्ड चोरून 60 हजार लांबविले

 


नगर- घरातील एटीएम कार्ड व पिन नंबर चोरून एका भामट्याने बँक खात्यातील 60 हजार रूपयाची रक्कम काढून घेतली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. बालमणी संदीप विरू (रा. कल्याण रोड, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी कल्याण रोडवरील बालाजी मंदीराजवळ असलेल्या विणकर सोसायटीमध्ये राहतात. अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे घरफोडून कपाटात ठेवलेले एटीएम कार्ड चोरले. त्या एटीएम कार्डवर पिन लिहीलेला होता. चोरट्याने एटीएम कार्डचा वापर करून फिर्यादी यांच्या खात्यातून वेळोवेळी 60 हजार रूपये काढून घेतले. फिर्यादी यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post