देशाची चिंता वाढली...ब्रिटनमधील नवा करोना स्ट्रेन भारतात दाखल, 6 जणांना लागण
नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये धुमाकुळ घालणारा करोनाचा नवा स्ट्रेन भारतातही दाखल झाला आहे. भारतात कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनने सहा जण बाधित आढळले आहेत. भारत सरकारने याबाबत माहिती दिली आहे. ब्रिटनमधून परतलेल्या सहा जणांमध्ये कोरोनाचा नवीन जिनोम आढळला आहे. यापैकी तीन जणांचे नमुने बंगळुरुच्या निमहंसमध्ये, दोघांचे हैदराबादच्या सीसीएमबी आणि एकाचा नमुना पुण्याच्या एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याच्या अहवालातून ही चिंताजनक माहिती समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, ब्रिटनमधून परतलेले हे सहा जण यूकेमध्ये आढळलेल्या सार्स कोवि-2 च्या नवे स्ट्रेनने संक्रमित आहेत. या सहा जणांना स्वतंत्र खोलीत आयसोलेट केलं आहे. संबंधित राज्य सरकारांनी तयार केलेल्या विलगीकरण कक्षात त्यांना ठेवलं आहे. याशिवाय त्यांच्या कुटुंबीयांना तसंच त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तर इतर प्रवाशांची माहिती घेतली जात आहे.
Post a Comment