याला म्हणतात काम... सरपंचपदासाठी लावली 42 लाखांची बोली

 याला म्हणतात काम... सरपंचपदासाठी लावली 42 लाखांची बोलीनंदुरबार : ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त बिनविरोध निवडीसाठी कुठे  आमदार निधी देण्याच आश्वासन तर कुठे थेट पदासाठी बोली लावण्याचे प्रकार होत आहेत. नंदूरबार जिल्ह्यात सरपंचपद घरात यावे यासाठी गावातील मंदिराला तब्बल 42 लाख रुपयांची देणगी देऊन पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत सांभाळण्याची तयारी खोंडामळी येथील प्रदीप वना पाटील यांनी दर्शविली आहे. खोंडामळी येथील ग्रामपंचायत निवडणुकीतील हा लिलाव सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.  साधारणत:  पाच हजार लोकसंख्येच्या या  ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. गावातील वाघेश्वरी माता मंदिर उभारणीला जो जास्त देणगी देईल त्याच्याकडे ग्रामपंचायत सुपूर्द करावी, असे ठरविण्यात आले. यासाठी अनेक भक्त पुढे सरसावले. सर्व पक्षांतील इच्छुकांनी त्यासाठी बोली लावली. यात प्रदीप वना पाटील यांनी इच्छा व्यक्त  करीत 42 लाखांची बोली लावली.केली.  या पैशातून मंदिराची उभारणी केली जाणार आहे. 

याशिवाय पाटील हे ठरवतील  तेच सदस्य बिनविरोध घेतले जाणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post