ब्रिटनमधील नव्या स्टे्रनमुळे लॉकडाऊनचे निर्बंध 31 जानेवारीपर्यंत कायम

ब्रिटनमधील नव्या स्टे्रनमुळे लॉकडाऊनचे निर्बंध 31 जानेवारीपर्यंत कायम नवी दिल्ली - केंद्रीय गृह मंत्रालयानं कोव्हिड-19 बाबत नव्या सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारनं जे काही नियम बनवले आहेत त्यांची मर्यादा 31 जानेवारी  2021  पर्यंत वाढवली आहे. भारतात सोमवारच्या आकडेवारीनुसार कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1,02,07,871  झाली आहे. त्यापैकी 2,77,301 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. एकूण प्रकरणांपैकी फक्त 2.72 टक्के लोक उपचार घेत आहेत. सलग सातव्या दिवशी उपचाराधीन लोकांची संख्या तीन लाखांपेक्षा कमी आहे.  ब्रिटनमध्ये नव्या स्वरूपाचा कोरोनाव्हायरस दिसून आला आहे. त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. कंटेनमेंट झोनमधून कोणतीही व्यक्ती बाहेर जाणार नाही किंवा तिथं येणार नाही याची काळजी घ्यावी. तसंच या भागातील व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. नियमांचं सक्तीनं पालन करावं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post