मोठी बातमी...इंग्लंडवारी करून आलेले आणखी 26 जण आढळले

 


मोठी बातमी...इंग्लंडवारी करून आलेले आणखी 26 जण आढळलेनगर : इंग्लंडमध्ये सापडलेल्या करोनाच्या नव्या स्ट्रेननंतर इंग्लंडमधून भारतात परतलेल्या प्रवाशांवर नजर ठेवली जात आहे. यात नगरमध्येही मागील काही काळात इंग्लंडवारी करून परतलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. गुरुवारी जिल्ह्यात इंग्लंडहून आलेले 13 जण निष्पन्न झाले होते. त्यात शुक्रवारी आणखी 26 जणांची भर पडली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. करोनाचा नवा स्ट्रेन अतिवेगाने संसर्ग फैलावत असल्याने इंग्लंडहून आलेल्या सर्वांनाच आयसोलेट करून त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत आहे. नगर महापालिका तसेच प्रशासनाने आतापर्यंत 39 जणांचा शोध लावला असून या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यात पॉझिटिव्ह आढळलेल्यांचे नमुने अधिक तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात येणार आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पारनेर, जामखेड, श्रीरामपूर, संगमनेर, श्रीगोंदे येथील प्रत्येकी एक जणाचा यात समावेश आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post