‘लेमन टी’साठी फेमस‘ रेणुका टी सेंटर’चे 25 व्या वर्षात पदार्पण

 ‘लेमन टी’साठी फेमस‘ रेणुका टी सेंटर’चे 25 व्या वर्षात पदार्पण
नगर (सचिन कलमदाणे): नगरमधील पटवर्धन चौक परिसरातील रेणुका टी सेंटर या छोट्याशा चहाटपरीच्या व्यवसायाचे 25 व्या वर्षात पदार्पण झाले आहे. दीपक पाथरकर यांनी अतिशय छोट्या स्वरुपात सुरु केलेला चहाचा व्यवसाय त्यांच्या चहाच्या चवीमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाला. दीपक दादांची ही चहाची टपरी अनेकांसाठी गप्पा रंगवायचा कट्टा बनली आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी पाथरकर यांनी नगरमध्ये प्रथमच लेमन टी सुरु केला आणि रेणुका टी सेंटर लेमन टीसाठी चांगलच फेमस झालं. कडक उकळलेला काळा चहा व त्यात ग्राहकांच्या आवडीनुसार पुदीना व लिंबू पिळून पाथरकर लेमन टी देतात. हा चहा पिण्यासाठी नगरच्या विविध भागातून चहाप्रेमी आवर्जून येतात. आज त्यांच्या या व्यवसायात त्यांची दोन मुलेही उतरलेली असून अवघ्या पाच रुपयात रेग्युलर चहा, लेमन टी उपलब्ध करून दिला जातो. व्यवसायात थोडी कल्पकता दाखवली तर त्यातूनही मोठे यश मिळवता येते हेच पाथरकर यांनी दाखवून दिले आहे. आज पंचवीसाव्या वर्षातील पदार्पणानिमित्त दीपक दादांनी आपली गाडी फुलांनी सजवली होती. अनेक वर्षांपासून याठिकाणी चहा घेण्यासाठी येणार्‍यांनी त्यांना यानिमित्त आवर्जून शुभेच्छा दिल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post