ब्रिटनहून आलेल्या ‘त्या’ 20 जणांचा करोना चाचणी अहवाल आला..

 ब्रिटनहून आलेल्या ‘त्या’ 20 जणांचा करोना चाचणी अहवाल  निगेटिव्हनगर : 25 नोव्हेंबरपासून ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांमध्ये 25 जण नगर जिल्ह्यातील पत्ता असलेले असून त्यातील 19 जण नगर महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. उर्वरित जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आहेत. या पैकी 20 जणांच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून उर्वरित पाच जणांचा अहवाल प्रतिक्षेत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली. इंग्लंडमध्ये करोनाचा नवीन आणि धोकादायक स्ट्रेन आढळून आल्याने महाराष्ट्रात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. जिल्हा प्रशासनाने माहिती घेतल्यानंतर जिल्ह्यातील एकूण 25 जणांनी ब्रिटनमध्ये प्रवास केल्याचे समोर आले आहे. त्यातील 20 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे. नागरिकांनी करोना प्रतिबंध नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post