‘यांच्या’मुळं 2014 ला झाला कॉंग्रेसचा मोठा पराभव

 ‘यांच्या’मुळं 2014 ला झाला कॉंग्रेसचा मोठा पराभव,

 दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या पुस्तकात मोठा गौप्यस्फोट



नवी दिल्ली : 2014 पासून सातत्याने पराभूत होत असल्यानं कॉंग्रेसमधील नेत्यांवर आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभ राहत असताना आता माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकातून कॉंग्रेस नेतृत्वावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं ऑगस्ट 2020 मध्ये निधन झालं. त्यांनी 2014 च्या कॉंग्रेसच्या पराभवाला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना जबाबदार धरलं आहे. त्यांनी या पुस्तकात लिहिलं आहे की, कॉंग्रेसचे काही सदस्य असं मानत होते की जर ते (मुखर्जी) पंतप्रधान झाले तर पक्षाच्या हातून सत्ता गेली नसती. ’द प्रेसिडेंशियल इयर्स’ या आपल्या पुस्तकातून त्यांनी हे गौप्यस्फोट केले आहेत. प्रणव मुखर्जी यांनी आपलं पुस्तक ’द प्रेसिडेंशियल इयर्स’ मध्ये लिहिलं आहे की, आपली राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाल्यानंतर कॉंग्रेसनं राजकीय दिशा गमावली. सोनिया गांधी पक्षातील मुद्द्यांना सांभाळू शकल्या नाहीत. तर मनमोहन सिंग यांची संसदेतील अनुपस्थितीमुळे खासदाराशी त्यांच्या वैयक्तीक संबंधांवरही पूर्णविराम लागला, असं मुखर्जी यांच्या पुस्तकात लिहिलं असल्याचं म्हटलंय. माझ्या पक्षातील काही सदस्यांचं असं मत होतं की 2004 मध्ये जर पंतप्रधान असतो तर 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसवर दारूण पराभव ओढवला नसता. परंतु या मताशी मी सहमत नाही, असं त्यांनी म्हटलंय. द प्रेसिडेंशियल इयर्स हे प्रणव मुखर्जी यांचं पुस्तक जानेवारी 2021 मध्ये प्रकाशित होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post