चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी शिक्षक रस्त्यावर, 18 डिसेंबरला शाळा, कॉलेज बंद

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी शिक्षक रस्त्यावर, 18 डिसेंबरला शाळा, कॉलेज बंद

 


चतुर्थश्रेणी कर्मचाऱयांवर अन्याय करणारा अध्यादेश रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षक भारतीने सोमवारी (ता. 14) राज्यभर जोरादार निदर्शने केली. तर या अध्यादेशाविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शाळा, कॉलेज 18 डिसेंबर रोजी बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या बंदला शिक्षक भारतीनेही पाठिंबा दिला आहे.

राज्यातील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱयांसाठी सुधारित आपृतीने आपृतीबंध निश्चित न करता शिक्षण विभागाने 11 डिसेंबर रोजी ठोक मानधनावर चतुर्थश्रेणी कर्मचाऱयांना नेमण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय चतुर्थश्रेणी कर्मचाऱयांच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याने हा बेकायदेशीर अध्यादेश रद्द करावा यासाठी शिक्षक भारतीने राज्यभरात सोमवारी आंदोलन केले.

शिक्षण विभागाने येत्या दोन दिवसात हा निर्णय मागे न घेतल्यास 18 डिसेंबरच्या शाळा महाविद्यालय बंदमध्ये सहभागी होणार असल्याचा इशारा शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post