बारावी बोर्ड परीक्षांसाठी अर्ज भरण्याची तारीख जाहीर

 

बारावी बोर्ड परीक्षांसाठी अर्ज भरण्याची तारीख जाहीरपुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २०२१ आयाेजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून सुरुवात करण्यात येणार आहे.


बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत सरल डेटाबेसवरून १५ डिसेंबर, २०२० पासून ४ जानेवारी, २०२१ पर्यंत भरायचे आहेत, तर व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार, तसेच काही विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ५ ते १८ जानेवारी, २०२१ दरम्यान ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येतील. अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच अर्ज भरावे, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post