जिल्ह्यात आता फक्त 3 टक्के सक्रिय रूग्ण, आज ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 आतापर्यंत ६६ हजार ७४२ रुग्ण बरे होऊन परतले घरी

 

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०६ टक्के

 

आज १८० रूग्णांना डिस्चार्ज तर ११० नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर 

अहमदनगर: जिल्ह्यात आज १८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार ७४२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यानकाल (सोमवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ११० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९७७ इतकी झाली आहे.

 

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३१खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३६ आणि अँटीजेन चाचणीत ४३ रुग्ण बाधीत आढळले.

 

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १९,  कर्जत ०३,  कोपरगाव ०२नगर ग्रामीण ०५नेवासा ०१पारनेर ०१अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०५कोपरगाव १२नगर ग्रामीण ०१नेवासा ०१,  पाथर्डी ०३राहाता ११संगमनेर ०१श्रीरामपूर ०१मिलीटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

अँटीजेन चाचणीत आज ४३ जण बाधित आढळुन आले. यामध्येमनपा ०२,  जामखेड ०१कर्जत ०२, कोपरगाव ०८नेवासा ०२पाथर्डी ०३, राहुरी ०१,  संगमनेर १५शेवगाव ०२श्रीगोंदा ०१श्रीरामपूर ०६अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

दरम्यानआज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४०अकोले ०६,  कर्जत ०४कोपरगाव ०८नगर ग्रामीण ०१नेवासा ०३,  पारनेर ०५,  पाथर्डी १९राहाता २५राहुरी ०४संगमनेर २९शेवगाव १५श्रीगोंदा ०९श्रीरामपूर ०७कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि जिल्ह्याबाहेरील ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

*बरे झालेली रुग्ण संख्या:६६७४२*

 

*उपचार सुरू असलेले रूग्ण: ९७७*

 

*मृत्यू:१०४३*

 

*एकूण रूग्ण संख्या:६८७६२*

 

(स्त्रोत: नोडल अधिकारीजिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

 

*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*

 

*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*

 

*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*

 

*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

 

*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*

 

*माझेकुटुंब_माझीजबाबदारी*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post