महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशिन फोडून लांबविण्याचा प्रयत्न

 महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशिन फोडून लांबविण्याचा प्रयत्न


                                                                               

नगर : सावेडी उपनगरातील  पाईपलाईन रोडवरील संकल्प अपार्टमेंटच्या तळमजल्यावर असलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडून मशिनच लंपास करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. बुधवारी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास ही घटना घडली. स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या चोरट्यांनी एटीएम मशीन मधील रक्कम असलेली पेटी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चोरांनी एटीएम मशिनला लोखंडी साखळी बांधून स्कार्पिओच्या मदतीने सेंटरमधून उखडून काढले. यादरम्यान आवाज आल्याने अपार्टमेंटमधील लोकांना जाग आली. त्याची चाहूल लागताच चोरटे मशिन तसेच सोडून पळून गेले. स्कॉर्पिओ गाडी एमएच 20 या क्रमांकाची होती, असे सांगण्यात येत आहे. शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे आणि सहाय्यक निरीक्षक किरण सुरसे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. 


                                                                                  छाया सौजन्य : विक्रम बनकर
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post