शिवसेनाप्रमुखांचे ‘हे’ स्वप्न साकार करण्याचा निर्धार करूया

 शिवसेनाप्रमुखांचे ‘हे’ स्वप्न साकार करण्याचा निर्धार करूया

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादनमुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदीनिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘‘महाराष्ट्राच्या महान नेतृत्वास माझी विनम्र आदरांजली. स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केलं. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा सन्मान व सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केला. महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं. स्वर्गीय बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया,’’ असं अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post