दिवाळी मुळे अवजड वाहतुकीबाबत मोठा निर्णय

 मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(1)(ब) जारीअहमदनगर, दि. 10शहरातील सक्कर चौक ते जीपीओ चौक या दरम्यान उड्डाणपुलाचे काम होणार असून त्या अनुषंगाने महावितरण विज महामंडळ यांचेकडून व्हि. के.इलेक्ट्रिकल्स ॲण्ड कॉन्ट्रक्टर यांचेकरवी लाईटचे काम करावयचे प्रस्तावित झालेले आहे. परंतु सध्या दिवाळी सण उत्साहामुळे नगर पुणे रोडवर मोठया प्रमाणात वाहतुकींची वर्दळ वाढलेली आहे. तसेच जिल्हाधिकारी यांचेकडील अधिसुचनेप्रमाणे अहमदनगर शहरातील बाजारपेठेत  माल खाली करणारे अवजड वाहनांना 22 वाजेपासुन ते 8 वाजेपावेतो अहमदनगर शहरात प्रवेश देण्यात येत आहे. नमुद अवजड वाहनांमुळे लाईटचे कामात व्यत्यय येवुन वाहतुकीची कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. तसेच अवजड वाहतुकीमुळे गंभीर किंवा किरकोळ अपघात होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये या करीता अहमदनगर शहरातील वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक  आहे.

मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(1)(ब) नुसार यापुर्वीचे बाह्यवळणाचे आदेश कायम ठेवुन दिनांक 10 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर 2020 व दिनांक 20 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2020 रोजीचे 22 वाजेपर्यंत ते पहाटे 6 वाजेपावेतो सर्व प्रकारची अवजड वाहतुक अहमदनगर शहराबाहेरुन बीड, सोलापुर, दौंड व पुणेकडुन औरंगाबाद, मनमाडकडे जाणारे अवजड वाहतुकीसाठी मार्ग- मुठ्ठी चौक- वाळुंज बायपास, अरणगाव बायपास, केडगाव बायपास, विळद बायपासमार्गे, औंरंगाबाद, मनमाडकडुन पुणे, दौंड, सोलापुर बीडकडे जाणारे अवजड वाहतुकीसाठी मार्ग- शेंडी बायपास, विळद बायपास, केडगाव बायपास, अरणगाव बायपास- वाळुंज बायपास, मुठ्ठी चोक मार्गे वळविण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. असे मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.    

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post