मंदिर खुले झाल्यानं सुखावलेला शिर्डी परिसर खूनाच्या घटनेनं हादरला

मंदिर खुले झाल्यानं सुखावलेला शिर्डी परिसर खूनाच्या घटनेनं हादरलानगर(विक्रम बनकर): साई मंदिर खुले झाल्यानं शिर्डीचे अर्थकारण पुन्हा सुरळीत होत असल्याने समाधानाच वातावरण असताना खूनाच्या घटनेने शिर्डी नगरी हादरली आहे.  रवींद्र साहेबराव माळी (रा.निमगाव देशमुख चारी, ता.राहता) असं मयताच नाव असून पोलिसांत दाखल तक्रारीच्या रागातून ही घटना घडली आहे. दि.19 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास शिर्डीजवळील निमगाव देशमुख चारी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी अजय वैजनाथ भांगे, विशाल रमेश पाटील, रविंद्र बनसोडे, समीर शेख, राजू पठाण, रंजना वैजनाथ भांगे, ललिता रमेश पाटील, सुनील लोखंडे, अक्षय शिंदे, महेश गायकवाड, कुणाल जगताप यांच्याविरोधात फिर्याद देण्यात आली आहे. आरोपी अजय वैजनाथ भांगे, विशाल रमेश पाटील,  रविंद्र बनसोडे यांचे विरुद्ध  शिर्डी पोलीस स्टेशन येथे  दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने एकत्र जमून कट रचून फिर्यादीचे वडील रवींद्र माळी यांना विशाल रमेश पाटील, रविंद्र बनसोडे व समीर शेख यांनी धक्काबुक्की करून धरून ठेवले. तसेच अज्जू पठाण, रंजना वैजनाथ भांगे, ललिता रमेश पाटील, सुनील लोखंडे,अक्षय शिंदे, महेश गायकवाड,कुणाल जगताप,अजय वैजनाथ भांगे याने त्याच्या हातातील धारदार चाकूने मयताचे मानेवर जोराने वार करून गंभीर दुखापत करून खून केला आहे. पोलिस उपअधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना चौकशीकामी ताब्यात घेतलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post