शिक्षक बँकेतील ‘ती’ उणीव भरुन काढणार : तांबे

 शिक्षक बँकेतील ‘ती’ उणीव भरुन काढणार : तांबे


अहमदनगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत सत्तेत असलेल्या गुरुमाऊली मंडळाने बँकेच्या पदाधिकारीपदी पाच वर्षात सर्वांना संधी मिळेल असे धोरण ठरवले होते. मात्र सुरूवातीचे तीन वर्षे रावसाहेब रोहोकले यांनीच अध्यक्षपदी कायम राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळं सत्ताधारी मंडळातील इतरांना संधी मिळाली नव्हती. आता रोहोकले सेवानिवृत्त झाल्यानंतर गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे यांनी वचनपूर्तीच्या दिशेने पाउल टाकले आहे. त्यानुसार शिक्षक बँकेचे विद्यमान अध्यक्ष शरद सुद्रीक व उपाध्यक्ष अर्जुन शिरसाठ यांनी बँकेच्या मासिक बैठकीत राजीनामे दिले आहेत. आता गुरुमाउली मंडळाच्या धोरणानुसार नवीन पदाधिकारी निवड केली जाणार आहे. सर्वांना समान संधी मिळण्यासाठी नवीन पदाधिकारी निवड केली जाणार आहे. पाच वर्षात सर्वांना समान संधी मिळण्यात झालेली अडचण व उणीव मी भरून काढणार असल्याचे बापूसाहेब तांबे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post