शब्दगंध च्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा

 शब्दगंध च्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा अहमदनगर : “शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य च्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून संपादकांनी आपल्या अंकाच्या तीन प्रती पाठवाव्यात”असे आवाहन शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी व अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी केले आहे.

           शब्दगंध च्या वतीने नेहमीच नाविन्यपूर्ण साहित्यिक उपक्रम राबविले जातात,संपादकांनी दोन महिने परिश्रम करून दिवाळी अंक वाचकांना उपलब्ध करून दिलेला असतो,त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हि स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याचे स्पर्धा प्रमुख किशोर डोंगरे यांनी सांगितले.सन २०२० मध्ये कोरोना च्या कालावधीत एकत्र न येता काही साहित्यिक कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले.उत्कृष्ट ठरणाऱ्या दिवाळी अंकाच्या संपादकांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार आहे. 

         संपादकांनी आपल्या अंकाच्या तीन प्रती ३० नोव्हेंबर पर्यंत शब्दगंध साहित्यिक परिषद,“फुलोरा”,लक्ष्मि कॉलनी,तपोवन रोड,भिस्तबाग महालाजवळ, सावेडी,अहमदनगर-४१४००३ मो.क्र.९९२१००९७५० येथे पाठवाव्यात असे आवाहन राजेंद्र उदागे,सुनील गोसावी यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post