सोमवारपासून शाळा सुरु करणे बंधनकारक नाही, स्थानिक प्रशासनाला दिले अधिकार

 सोमवारपासून शाळा सुरु करणे बंधनकारक नाही, स्थानिक प्रशासनाला दिले अधिकार

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहितीमुंबई: येत्या सोमवारपासून राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. पण, शाळा सुरू करणे बंधनकारक नाही, अशी भूमिका राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मांडली आहे. गायकवाड यांनी सांगितलं की, येत्या सोमवारपासून राज्यात शाळा सुरू करत आहे. पण शाळा सुरू करणे बंधनकारक नाही. राज्यातील विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून स्थानिक पातळीवर कोरोनाची परिस्थिती काय आहे, हे ठरवून निर्णय घेतली. अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पालकांची संमती गरजेची असून विद्यार्थी शाळेत आलेच पाहिजे, असंही बंधन नसणार आहे. शाळा जरी सुरू झाल्या तरी ऑनलाईन शिक्षण बंद नसेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच नुकसान होणार नाही, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post