राज्यातील शाळा सुरु होण्याची अनिश्चितता, मुंबई, ठाण्यात शाळा बंदच

 राज्यातील शाळा सुरु होण्याची अनिश्चितता, मुंबई, ठाण्यात शाळा बंदच

नगरमध्ये दिशानिर्देश जारी पण शिक्षकांच्या करोना चाचणीस होतोय विलंबनगर : राज्य सरकारने दिवाळीनंतर 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यास परवानगी दिली. मात्र आता प्रत्यक्ष दोन राहिले असताना राज्यभरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीनंतर करोनाचे आकडे वाढू लागल्याने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरु करणे बंधनकारक नसल्याचे जाहीर केले. तसेच याबाबतचे सर्वाधिकार स्थानिक प्रशासनाला दिल्याचे म्हटले आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई तसेच ठाण्यात 31 डिसेंबरपर्यंत शाळा सुरु होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात शाळा सुरु करण्याची तयारी करण्यात आली असली तरी अनेक ठिकाणी प्रशासनच व्दिधा मनस्थितीत अडकल्याचे चित्र आहे. नाशिकमध्ये पालकांनी शाळा सुरु करण्यास विरोध दर्शवला आहे.

नगर जिल्ह्यात  जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी शाळा सुरु करण्याबाबत दिशानिर्देश जारी केले आहेत. शाळांमधील सॅनिटायझेशनसह इतर अत्यावश्यक बाबींबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाने जारी केल्या आहेत. सध्या जिल्ह्यातील शिक्षकांची करोना चाचणी करून घेण्यात येत आहे. मात्र अनेक ठिकाणी हे काम अपेक्षित गती नसल्याने सोमवारी जिल्ह्यातील किती शाळा सुरु होतील याबाबत प्रश्नचिन्हच आहे. नगर तालुक्यात शुक्रवारपर्यंत 1500 पैकी 658 शिक्षकांचीच तपासणी झाली आहे. उर्वरित तपासण्या रविवारपर्यंत पूर्ण करून त्या शिक्षकांना ना हरकत मिळणे अवघड आहे. यामुळे शाळा सोमवारीच सुरु होण्याची शक्यता कमीच आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post