विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची कोणतीही सक्ती नाही

 

विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची कोणतीही सक्ती नाही

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची स्पष्टोक्ती
अहमदनगरः राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी मुलांना शाळेत येणे सक्तीचे नाही, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनी दिली आहे. मुलं घरी राहूनदेखील ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतात, असंही राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केलं आहे.  ते नगरला पत्रकारांशी बोलत होते.

सरकारने जबाबदारी घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र एखाद्या ठिकाणी जास्त उद्रेक झाला, तर स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्यास सांगितल्याचे तनपुरे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post