स्टेट बँकेच्या खातेदारांची होवू शकते फसवणूक...बँकेने केले ‘हे’ आवाहन

 स्टेट बँकेच्या खातेदारांची होवू शकते फसवणूक...बँकेने केले आवाहनमुंबई : भारतीय स्टेट बँकेनं आपल्या ग्राहकांना ट्विट करुन एक महत्त्वाचा संदेश जारी केला आहे. यामध्ये बँकेने ग्राहकांना आवाहन केलं आहे की, एसबीआयच्या नावे जर तुम्हाला खोटा आणि बनावट ईमेल आला तर त्यास अजिबात उत्तर देऊ नका. एसबीआय बँकेच्या नावावर ग्राहकांना बनावट ईमेल पाठवला जात असल्याचं बँकेनं म्हटलं आहे. त्यामुळे ग्राहकांनी बँकेच्या नावे आलेला मेल खरा आही की फसवणुकीसाठी आहे याची खात्री नक्की करून घ्या असं आवाहन करण्यात आलं आहे. एसबीआयने ट्विट म्हटलं आहे की, बँक ग्राहकांना विनंती करत आहे की त्यांनी सोशल मीडियावर अलर्ट राहा. कोणत्याही दिशाभूल आणि बनावट मेसेजद्वारे तुमची फसवणूक केली जाऊ शकते यामुळे ग्राहकांनी कुठल्याही मेसेजवर आपली खासगी माहिती शेअर करण्याआधी तपासणी करा.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post