याला म्हणतात ‘लोकप्रतिनिधी’...दिवाळीत स्वखर्चाने रस्त्यावर एलईडी दिवे बसवून उजळवले गाव

 याला म्हणतात ‘लोकप्रतिनिधी’...दिवाळीत स्वखर्चाने रस्त्यावर एलईडी दिवे बसवून उजळवले गाव

पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस यांची गावाला प्रकाशभेटनगर : दीपावली निमित्त नगर तालुका पंचायत समितीचे सदस्य रविंद्र कडूस यांनी सारोळकरांना अनोखी प्रकाशभेट दिली. ऐन दिवाळीत गावातील रस्ते अंधारात असू नयेत, नागरिकांची गैरसोय होऊ नये व लक्ष्मी पूजनावेळी सर्वत्र उजेड असावा या हेतूने कडूस यांनी गावातील सार्वजनिक ठिकाणी व अंतर्गत रस्त्यांवर तसेच वाड्या- वस्त्यांवर सुमारे 31 एलईडी दिवे बसविले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ह्या कामासाठी प्रयत्न सुरू आहेत परंतु तांत्रिक अडचणींमुळे कामाला विलंब होत होता. गाव हेच कुटुंब समजून एक कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेतून त्यांच्या पं. स. सदस्य म्हणून आजतागायत मिळालेल्या मानधनातून सुमारे 50 हजार खर्चून हे काम करण्यात आले. दिवे बसविताना कुठेही राजकीय हित पाहिले नाही तसेच दुजाभाव केला गेला नाही. अनेक वर्षांपासून सुरू असलेली गावहिताची कामे कुठलेही पद असो नसो यापुढेही अविरत सुरू राहतील असा विश्वास त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post