आघाडी सरकार ‘या’ महिन्यापर्यंत टिकेल : माजी मंत्री शिवाजी कर्डिले

 तनपुरेंच्या दाव्याला कर्डिलेंचे जोरदार प्रत्युत्तर

आघाडी सरकार ‘या’ महिन्यापर्यंत टिकेल : माजी मंत्री शिवाजी कर्डिलेनगर : नगर जिल्ह्यातून भाजपमधून कोणीच राष्ट्रवादीत प्रवेश करणार नाही ही गोष्ट नक्की आहे. तनपुरेंचाच इतिहास पक्ष बदलण्याचा असून 2014 ला उषाताई तनपुरे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर माझ्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे कदाचित त्या शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे त्यांना सांगायचे असावे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार जास्तीत जास्त डिसेंबरपर्यंत टिकेल, त्यानंतर भाजपचे सरकार राज्यात दिसेल, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केला आहे.

नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना कर्डिले म्हणाले की, तनपुरे यांनी दावा केला असला तरी आताचे राज्यातील सरकार पुढची पाच वर्षे नाही तर आताचीच पाच वर्षे पूर्ण करू शकणार नाही. जास्तीत जास्त येत्या डिसेंबरपर्यंत हे सरकार टिकेल असे वाटते. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर राष्ट्रवादी प्रवेशासाठी माझ्याकडे कोणीही संपर्क केलेला नसून मला अशा संपर्काची आवश्यकताही नाही, असेही कर्डिले यांनी स्पष्ट केलं. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post