सोमवारपासून साई मंदिर उघडणार, पण दर्शनासाठी 'ही' गोष्ट आवश्यक

 

सोमवार पासून साई मंदिर उघडणार, पण दर्शनासाठी ऑनलाईन पास आवश्यकनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील मंदिरे खुली करण्याची घोषणा केली. त्यानुसार शिर्डीतील साईमंदिरही  सोमवारपासून साईदर्शनासाठी खुले होणार आहे. त्यासाठी भाविकांना ऑनलाईन बुकिंग (online pass) करावी लागणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानने दिली आहे. 


शिर्डीतील साईमंदिरात दररोज 6 हजार भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे. ज्या भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करुन ठेवलेले आहे; त्यांनीच शिर्डीत यावे असे आवाहनदेखील साईबाबा संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलेले असेल त्यांनीच शिर्डीत यावे, कोरोना प्रतिबंधंक सर्व नियम पाळावेत, असे आवाहन साईबाबा संस्थेने केले आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post