साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रलंबित वेतन व बोनस त्वरित द्यावा

साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रलंबित वेतन व बोनस त्वरित द्यावा

अन्यथा भाजप  पदाधिकाऱ्यांचे आमरण उपोषण, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांचा इशारा
        शिर्डी : साईबाबा संस्थांनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन गेल्या तीन महिन्यापासून झालेले नाहीत.हे कर्मचारी  मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून  त्यांच्या कौटुंबिक उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन दिपावली सणामध्ये  या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर आर्थिक  नियोजन ढासळल्यामुळे  काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे,या सर्व गोष्टींचा साई संस्थानने त्वरित विचार खालील मागण्यां दि.५.११.२० पर्यंत मान्य कराव्यात अन्यथा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आमरण उपोषण करतील, असा इशारा भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी दिला आहे.

     सदर निवेदन साई संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांना भाजपा उत्तर नगर जिल्हाअध्यक्ष राजेंद्र  गोंदकर यांच्या नेतृत्वात देण्यात आले.

१)सर्व २७०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यात यावे.

२) दरवर्षीच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) देण्यात यावा.

३) समान काम समान वेतन कायद्याची अंमलबजावणी करावी तसेच यापूर्वी कमी केलेली ४०%टक्के वेतनवाढ पूर्ववत करावी.

४) आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांनाही त्यांचे प्रलंबित वेतन देण्यात यावे.

           यावेळी जिल्हाउपाध्यक्ष  पवार ,तसेच उत्तर भारतीय जिल्हा संयोजक श्री.राजेंद्रजी शर्मा, कंत्राटी कर्मचारी संघटनेचे श्री.गोटीराम दाढे, श्री.संदीप पवार, श्री.दिपक जपे, श्री.दत्तात्रय दरेकर, श्री.उमेश वाघ,श्री.किरण कांदळकर आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post