मध्यरात्री हॉटेलजवळ थांबला...चोरट्यांनी साधला डाव

 


मध्यरात्री हॉटेलजवळ थांबला...चोरट्यांनी साधला डावनगर- कामगाव परिसरात हॉटेल जवळ थांबलेल्या एकाला अज्ञात चोरट्यांनी लुटले. 55 हजार रूपयांची रोख रक्कम व एक मोबाईल असा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद सुंदर चव्हाण (वय- 36 रा. घुमटवाडी ता. पाथर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. नगर तालुक्यातील कामरगाव परिसरातील हॉटेल ग्रीन पार्क समोर ही घटना घडली. विनोद चव्हाण हे प्रवासादरम्यान कामरगाव शिवारातील हॉटेल ग्रीन पार्क येथे थांबले होते. शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याकडील 55 हजाराची रोकड व त्यांचा मोबाईल चोरून पोबारा केला. त्यांनी तालुका पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जारवाल करीत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post