सराफाची गाडी अडवून सुमारे ६० लाखांचा ऐवज लांबवला


सराफाची गाडी अडवून सुमारे ६० लाखांचा ऐवज लांबवलानगर : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील सराफ अतुल पंडीत यांचे माहिजळगाव येथे सराफ दुकान असून नेहमी प्रमाणे सहाच्या दरम्यान त्यांचे लहान बंधू राहूल पंडीत व अतुल पंडीत  दुकान आवरून आपल्या चारचाकी गाडीतून मिरजगाव येथे येत होते. मात्र वाटेत नगर- सोलापूर  महामार्गावर बाभूळगाव शिवारात कवठीच्या लवणात  मोटारसायकलवरुन आलेल्या सहा चोरट्यांनी त्यांच्या चारचाकी गाडीला मोटारसायकल आडव्या लावून गाडीची काच फोडली. पंडित यांच्या डोक्याला पिस्तुल लावून त्यांना सतूर, तलवार व लाकडी दाडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. तसंच त्यांच्या अंदाजे 60 लाख रूपयांचे सोने-चांदीचे दागिने घेऊन पसार झाले.

यावेळी पंडीत यांनी तातडीने या घटनेची माहिती आपल्या मित्रांना,नातेवाईकांना व पोलिसांना कळवली. यावेळी एका गाडीवरील तीन चोरटे माहिजळगावच्या दिशेने तर दुसऱ्या गाडीवरील तीन चोरटे बाभूळगाव परिसरात पळाले. या दरम्यान मोठ्या संख्येने नागरीक जमा होऊन चोरट्यांच्या शोध सुरू करण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post