संशयावरुन पकडलेल्या रिक्षात सापडले 57 लाखांचे सोने...

 


संशयावरुन पकडलेल्या रिक्षात सापडले 57 लाखांचे सोने...आरोपीकडून गंजबाजार परिसरात बॅग सापडल्याचा दावा

                                                                                        प्रातिनिधीक छायाचित्र

नगर : कोतवाली पोलिसांना दि.15 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री पेट्रोलिंग दरम्यान एका रिक्षामध्ये 1 किलो 368 ग्रॅम सोनं ज्याची किंमत 56 लाख 89 हजार 690 रुपये आहे अशी बॅग आढळून आली. पेट्रोलिंग दरम्यान मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने बाबा बंगाली परिसरात एक रिक्षा संशयावरुन अडवली. रिक्षाचालक फैरोज रफीक पठाण (रा.बाबा बंगाली, नगर) हा पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातील रिक्षाची झडती घेतली असता त्यात दागिने मिळून आले. या दागिन्यांच्या मालकी हक्काबाबत तो समाधानकारक उत्तरे देवू शकला नाही. त्यानुसार त्याच्या विरुध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीस दागिन्यांची बॅग गंजबाजार परिसरात सापडल्याचा दावा त्याने केला आहे. सदर दागिन्याच्या बॅगेबाबत मालकी हक्क असल्यास योग्य कागदपत्रांनिशी संपर्क साधण्याचे आवाहन कोतवाली पोलिसांनी केले आहे. 

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी नितीन रणदिवे, पो.ना.योगेश भिंगारदिवे, शाहीद शेख, रियाज इनामदार, सुजय हिवाळे, प्रमोद लहारे, सुमित गवळी, भारत इंगळे यांनी केली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post