अहमदनगर रेल्वे स्थानक सल्लागार समितीवर रत्नाकर ठाणगे यांची निवड
अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस अपंग सेलचे अध्यक्ष रत्नाकर ठाणगे यांची अहमदनगर रेल्वे स्थानक सल्लागार समितीवर दिव्यांग प्रती निधी म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी अहमदनगर रेल्वे स्थानक प्रमुख श्री तोमर साहेब , मुख्य वाणीज्य निरिक्षक आर.एस. मिना साहेब , मुख्य बुकिंग पर्यवेक्षक एस.ए. बेलपवार यांनी रत्नाकर ठाणगे यांना निवडिचे पत्र दिले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .
यावेळी रत्नाकर ठाणगे म्हणाले, मी रेल्वे सल्लागार समितीवर नव्याने या आलो आहोत, नगर रेल्वे स्थानक मोठे आहे, त्यामुळे काम करतांना सर्वांचे सहकार्य लागणार आहे. दिव्यांगासाठी कल्याणकारी उपक्रम राबविणार आहोत. त्यांचे रेल्वे स्थानकातील आसणारे सर्व प्रश्न सोडविण्यात येतील . तसेच रेल्वे प्रशासना कडून दिव्यांगा चे रेल्वे सवलत पास तसेच दिव्यांगाच्या इतर योजना यासाठी कायमच प्रतिसाद मिळत असतो. यापूर्वी दिव्यांगाच्या राबविण्यात आलेल्या उपक्रमांना त्यांचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. त्यांच्या निवडी बददल खासदार सुप्रियाताई सुळे , नामदार प्राजक्तदादा तनपुरे , आमदार संग्राम भैया जगताप , आमदार निलेश लंके , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके , जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी त्यांचे अभिनंदन केले
Post a Comment