भाजपला आणखी एक धक्का, माजी केंद्रीय मंत्र्याची पक्षाला सोडचिठ्ठी

 भाजपला आणखी एक धक्का, माजी केंद्रीय मंत्र्याची पक्षाला सोडचिठ्ठीऔरंगाबाद: महाराष्ट्रात भाजपला आणखी एक राजकीय धक्का बसला असून माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. जयसिंगराव गायकवाड हे जनसंघापासून भाजपमध्ये कार्यरत होते. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांनी मराठवाड्यात पक्षाच्या विस्तारासाठी काम केले होते. बीड लोकसभा मतदारसंघातून ते तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. तसंच, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातूनही त्यांनी दोनदा बाजी मारली होती. त्यांनी राज्य मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्रिपद भूषवले होते. तसंच, केंद्रात शिक्षण व खाण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली होती. सध्या ते भाजपच्या प्रदेश कार्यसमितीचे सदस्य होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मात्र ते सक्रिय राजकारणातून बाजूला फेकले गेले होते. आताही पदवीधर मतदारसंघातून त्यांनी तयारी केली असताना पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने गायकवाड यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post