भाजपत जिल्हाध्यक्षांविरोधात बंडाचा झेंडा, श्रीरामपुरात बूथ प्रमुखांचे सामूहिक राजीनामे

 

भाजपत जिल्हाध्यक्षांविरोधात बंडाचा झेंडा, श्रीरामपुरात बूथ प्रमुखांचे सामूहिक राजीनामे
शिर्डी :  अहमदनगर जिल्हा भाजप अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी बंड पुकारला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भाजपच्या 310 बुथ प्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. या सदस्यांनी राजीनामा देऊन संचालन समिती स्थापन करून वेगळी चूल मांडली आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांचा मनमानी कारभार सुरू आहे. पक्षाची ध्येयधोरणे न राबवता कार्यकर्त्यांवर मनमानी कारभार करत आहेत, या प्रकराचा भाजप कार्यकर्त्यांनी बंड पुकारून निषेध करण्यात केला. श्रीरामपूर तालुक्यासह परीसरातील 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

श्रीरामपूर शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात आज सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी सर्वानुमते पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी संचालन समितीची स्थापना करण्यात आली असून जिल्हाध्यक्षाचा कोणताही निर्णय ही समिती आता मान्य करणार नाही, असा ठराव बंड पुकारलेल्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post