पुण्यातील शाळा सोमवारपासून सुरु होणार नाहीत

 

पुण्यातील शाळा १३ डिसेंबर पर्यंत बंदचपुणे: कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने पुण्यातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली आहे. पुणे महापालिका क्षेत्रातील खासगी आणि महापालिका शाळा बंद राहणार आहेत. 13 डिसेंबरला कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा उघडण्याबाबत निर्णय घेऊ, असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे. याआधी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता पुणे महापालिका क्षेत्रातीलही सर्व शाळा 13 डिसेंबरर्यंत बंद राहणार आहेत

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post