जिल्ह्यात सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्या व नियुक्त्या

 जिल्ह्यात सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्या व नियुक्त्यानगर (विक्रम बनकर): पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात नव्याने हजर झालेले सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय काही जणांच्या बदल्यांही करण्यात आल्या आहेत. घारगांव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सपोनि जीवन बोरसे यांची श्रीरामपूरला अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयात, कर्जत पोलिस ठाण्यातील सपोनि मनोहर इडेकर यांची नगरला तोफखाना पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. नव्याने हजर झालेले सपोनि रामेश्वर कायंदे यांना पाथर्डी पोलिस स्टेशन, सुनिल बडे यांना जामखेड पोलिस स्टेशन, शाहीदखान पठाण यांना बीडीडीएस,नगर, दिलीप तेजनकर यांना श्रीगोंदा पोलिस स्टेशन, दिलीप शिरसाट यांना जिल्हा विशेष शाखेत नियुक्ती देण्यात आली आहे.


पोलिस उपनिरीक्षक कृष्णा धायवट यांची तोफखाना पोलिस ठाण्यातून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात, पंकज शिंदे यांची भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यातून संगमनेर शहर पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. नव्याने हजर झालेले पोलिस उपनिरीक्षक रणजित गट यांना श्रीगोंदा पोलिस स्टेशन, मधुकर शिंदे यांना राहुरी पोलिस स्टेशन, अनिल गाडेकर यांना ट्रायल मॉनिटरिंग सेल, अशोक लाड यांना साई मंदिर सुरक्षा, शिर्डी, नवनाथ दहातोंडे यांना मानवसंसाधन विभाग, नगर, दीपक पाठक यांना एमआयडीसी पोलिस स्टेशन, शैलेंद्र जावळे यांना अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय, सज्जन नार्‍हेडा यांना जामखेड पोलिस ठाण्यात तर धिरज राउत यांना घारगाव पोलिस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post