करोनाच्या पार्श्र्वभूमीवर पोलिसांना आता दंड वसुलीचे अधिकार

करोनाच्या पार्श्र्वभूमीवर पोलिसांना आता दंड वसुलीचे अधिकार

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे आदेश जारी


प्रातिनिधिक छायाचित्र

नगर : कोविड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नागरिकांना मास्क लावणं बंधनकारक करण्यात आले आहे. विना मास्क फिरणार्यांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आदेश जारी करताना पोलिसांना दंड वसुलीचे अधिकार दिले आहेत. दि.११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत सदर दंड वसुली पोलीसांना करता येणार आहे. विना मास्क फिरणारे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणार्याकडून १०० रूपयापर्यंत दंड वसूल करण्यात येणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post