लॉकडाऊनबाबत आ.रोहित पवारांची सरकारकडे मोठी मागणी

 


लॉकडाऊनबाबत आ.रोहित पवारांची सरकारकडे मोठी मागणीनगर : राज्य सरकारने करोना आलेख खाली येत असल्याने राज्यात सिनेमागृह व नाट्यगृह सुरु केली आहेत. दिवाळीनंतर संपूर्ण अनलॉक होईल, असे संकेतही सरकारकडून मिळत आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ.रोहित पवार यांनीही राज्य सरकारकडे महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. राज्यातील संपूर्ण लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घ्यावा, असे व्टिट त्यांनी केले आहे. 

आ.पवार यांनी म्हटले आहे की,‘सिनेमागृह व नाट्यगृह सुरु झाल्यानंतर आता संपूर्णपणे लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेण्यात यावा. मात्र, त्यासोबतच नागरिकांनी देखील कायदा-सुव्यवस्थेचं पालन करावं आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून मास्कचा वापर करत स्वतःची काळजी घ्यावी.’


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post